आणखी काही कविता
झुला ------ बाळ मुठीतिल स्वप्नांसाठी घे प्राणांचे पंख तुला आकाशाला घाल गवसणी जरी मातीचे पाय तुला अक्षर ब्रह्माचे घन बरसत चिंब जाहले घर सारे थेंबो थेंबी बिंब तुझे हे पहात बसले ग तारे जा कर गट्टी त्यांच्याशी न् सांग मनोगत जगताला भूत भविष्या आधी घ्या हो क्षण हर्षावर हिंदोळा.. तू मनकवडी सर्व जाणशी तोल सांगशी सांभाळा इवल्या पायी उडवित बसशी सुख दु:खाचा पाचोळा या गहिऱ्या डोळ्यात बुडावे घेत स्वत:चा धांडोळा तू पहिले अज्ञान आमुचे ज्ञानाच्याही पलिकडले पलिकडले ते दीप लक्ष हे पहा घरोघर झगमगले हा दीपोत्सव हा जन्मोत्सव चिरंतनाचा एक झुला.. © रमेश यशवंत वाकनीस©