Posts

Showing posts from February, 2025

नाही नाही

नाही नाही -----------  रंग रूप गंधे|सुखावतो जगा  ऐसा अहं फुला|नाही नाही  सावली धरून वृक्ष उभे तरी  उपकारभाव|नाही नाही  चंद्रसूर्य नित्य| प्रकाशती नभी  गर्व याचा तया| नाही नाही  नद्या सागराला| भेटाया वाहती  तृष्णा शमविण्या|नाही नाही   सृष्टीचे चालले|नृत्य अविरत  हेतू त्यात दूजा|नाही नाही  अद्भूत प्रेमाचा|दिव्य आविष्कार  व्यक्त तरी व्यक्त|नाही नाही  ©रमेश यशवंत     

कविता

कविता  --------  रोजच माझ्या जखमेवरती  मलम लावते..  तलम रेशमी नात्याचे ती  गोफ गुंफीते.. हळू हळू मन माझे करीते  आपुल्या सम अन्  फुले सुगंधित उधळीत हृदयी  खुद्कन हसते..  ©रमेश यशवंत  ११ फेब्रुवारी २०२५