आणखी काही कविता

निरर्थक शब्द निरर्थक अर्थ
निरर्थक व्यर्थ जाऊ नये
निरर्थक नाव निरर्थक गाव
निरर्थक भाव आणो नये
निरर्थक सत्य निरर्थक मिथ्य
निरर्थक नित्य काळ वाहे
निरर्थाचे पोटी निरर्थक बीज
निरर्थकपणे वाढू द्यावे
निरर्थक जन्म निरर्थक मृत्यू
निरर्थकेश्वर आळविता
©रमेश यशवंत वाकनीस©
३१ आॅगस्ट २०१९😉😃

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७