Posts

Showing posts from October, 2024

सुख वग्गो १५

सुख वग्गो १५(सुख वर्ग) पाली-मराठी काव्यानुवाद --------------------------------- १९७. सुसुख़ वत ! जीवाम वेरिनेसु अवेरिनो | वेरिनेसु मनुस्सेसु विहराम अनातुरा ||१५.१ किती सुखात जगतो आम्ही ! वैऱ्यात अवैरी होऊन विहार करतो आम्ही ! १९८. सुसुखं वत ! जीवाम आतुरेसु अनातुरा | आतुरेसु मनुस्सेसु विहराम अनातुरा ||१५.२ किती सुखात जगतो आम्ही ! जन दु:खी तरीही मुक्त - दु:खातुन झालो आम्ही ! १९९. सुसुखं वत ! जीवाम उस्सुकेसु अनुस्सुका | उस्सुकेसु मनुस्सेसु विहराम अनचस्सुका ||१५.३ किती सुखात जगतो आम्ही! आसक्त जनातिल अनासक्त हो आम्ही..! २००. सुसखं वतं ! जीवाम येसं नो नत्थि किंचनं | पीतिभक्खा भविस्साम देवा आभस्सरा यथा ||१५. कंगाल ,कफल्लक तरीही श्रीमंत असे हो आम्ही प्रीतीचे सेवुन अन्न प्रीतीच उधळतो आम्ही किती सुखात,किती सुखात किती सुखात जगतो आम्ही! २०१. जयं वेरं पसवति दुक्खं सेति पराजितो | उपसन्तो सुखं सेति हित्वा जयपराजयं ||१५.५  विजयी वैर उद्भवे दु:ख निद्रा पराजिता विकारा पैल त्या शांत सुख निद्रा  जयापजय २०२. नत्थि रागसमो अग्गि नत्थि दोससमो कलि | नत्थि खन्धसमा दुक्खा‌ नत्थि सन्तिपरं...

व्याख्यानाचे मुद्दे

वाचाल तर वाचाल  -------------------------  आज वाचन प्रेरणा दिन आहे.भारताचे सायंटिफिक अडव्हायझर राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा करतो.हा काही एखादा सण नाही की या दसऱ्याला घराच्या दारावर बांधलेलं झेंडूच्या फुलमाळांचं तोरण पुढल्या दसऱ्याला काढलं तर चालतंय.मला वाटतं वाचन प्रेरणा दिन म्हणजे जन्मभर अंगिकारायचं व्रत आहे.म्हणूनच  वाचाल तर वाचाल असा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे.या शीर्षकात दोन प्रश्न दडलेले आहेत.काय वाचाल तर वाचाल? हा पहिला प्रश्न.आणी कशातून वाचाल ? हा दुसरा प्रश्न.आता असं काही नाही की पुस्तक वाचलं नाही तर आपण लगेच मरणार आहोत.जगणारच आहोत.पण नुसतंच पोटार्थी,घाण्याला जुंपलेल्या बैलांसारखं फिरत राहणं आपल्याला अर्थपूर्ण वाटत नाही म्हणून आनंददायी देखील वाटत नाही.. "हे जीवन वेड्या अर्थशून्य जर नसते शब्दात कवींनी काय मांडले असते? एकाच दिशेने ओढीत गाडा गेलो  ना भिंती; वाडा चौसोपी बांधित बसलो"  मित्रांनो,प्रत्येक माणसाच्या अंतर्मनातलं हे स्वप्नं आहे.मग तो अशिक्षित असो,गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला असंच वाटत असतं की कोणत्याही प्रका...