आणखी काही कविता

गाणं
-----
आकाशा आकाशा
धरतीवरती ये
छोटी छोटी मुले
तुझी मोठ्ठी होऊ दे..
हिरवी हिरवी पाने
कळ्या फुले तुला घे
चांदण्यांच्या परी-
आम्हालाही चमकू दे..
उन्हा पावसात जरा
तूही भिजून बघ
खाली वाकून तुझी
आम्हा मजा बघू दे..
अंधारातुन प्रकाशाचा
शोध घेऊन बघ
बोधाच्याही पैल जाऊन
मोद चाखून बघ..
©रमेश यशवंत वाकनीस©
२७/१२/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७