आणखी काही कविता
उशाशी नको स्वप्न
----------------------
पुन्हा मद्य पेला नवे दु:ख झेला
पुन्हा तोच वेड्या गुन्हा जाहला..!
कसा सांग मी चंद्र झाकून ठेवू?
जगाला दिसे हा जरी डाग काळा..
उन्हातील गाणे विसाव्यास आले
तुझा तप्त रेतीवरी बंगला..!
उशाशी नको स्वप्न ठेवूस राणी
नकोना करु गे मला आंधळा.. !
कुठे जीव घालू मरायास माझा?
जगाया विके आत्मा पांगळा..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
१४/११/१९९२
Comments
Post a Comment