पुनर्लेखन ९
पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा.. साहित्यप्रकार: कादंबरी कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! लेखक : रमेश यशवंत वाकनीस प्रसारण दिवस : रविवार -------------------------------------------- * निळ्या संगमरवरात बांधलेल्या अतिभव्य अशा राजप्रासादा मधील महाराज शुद्धोदन व महाराज्ञी मायावती यांच्या विश्राम महालाला जोडूनच उभे असलेलेले अतिथीगृह आज आम्रपर्ण व झेंडूच्या फुलमाळांनी मंडित झालेले दिसत होते. अतिथीगृहात उघडणाऱ्या रत्नजडित स्तंभावरील कमानीपासून जमिनीपर्यंत गुलाबी झिरमिरीत रेशमी पडदा मंद समीर झुळकांनी झुलत होता.या कमानीच्या बरोब्बर समोर अतिथीगृहाचे विशाल प्रवेशद्वार होते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभांवर दोन सिंहमुखे कोरलेली होती.त्यांच्या विस्कटून उभ्या राहिलेल्या आयाळी इतक्या खऱ्या वाटत होत्या की पाहणाऱ्याला त्यांना स्पर्श करुन बघण्याचा मोह आवरला नसता. गडद तांबड्या पाषाणात बांधलेल्या या अष्टकोनी वास्तूच्या भिंतींवर स्वागतातुर नर्तिकांची शिल्पे अशा खुबीने कोरली होती की स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा खेळवणारी ती गवाक...