आणखी काही कविता

गूज ५
-----
मृत्यूचे गूज मला कळले रे कळले
जन्माने पाय तुझे मळले रे मळले
अनवाणी चाल असा वाट नागमोडी..
काय तुला सांगू रे जगण्यातिल गोडी 
रंगशील सांग किती स्वप्न सप्तरंगी
साद त्यात घालतोच एक तो निरंगी
शपथ तुला दु:खाची पाठ नको सोडू
हसव काळ विझव आग हात नको जोडू
तू योध्दा जीवन हे समरांगण सारे
शत्रू तूच मित्र तूच जिंक स्वत:ला रे
जा बुध्दा शरण झणी पेटवून देह
जन्म मरण नाही असे मिळव शांत गेह..
©रमेश यशवंत वाकनीस©
३०/१/२००२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७