आणखी काही कविता
पाऊसधार..
------------
सरसर..सरसर..
पाऊसधार कोसळते
कोसळते मन भिजून जाते
हर्ष मनाला होऽदेते..
अंधाराची शकले शकले
चंद्रवनीचे उन उतरले
वीज ही झाली चीज गळ्यातिल
उठ! पाखरा आई म्हणते..
हर्ष मनाला हो देते..
उतराई मी क्षणाक्षणांची
या प्रीतीच्या फुलाफुलांची
माती मधुनी कस्तुरगंधी
आकाशाचे स्वप्न उजळते..
हर्ष जगाला होऽ देते..
©रमेश यशवंत वाकनीस©
२४/१२/१९९२
Comments
Post a Comment