आणखी काही कविता
आम्ही २२
--------
आम्ही न प्यायलो रे बेहोश व्हायला
आम्ही पितो परंतू होश यायला
विसरुन चालतो की आलो
कशास ते
आमुचेच रक्त आमुच्या पेल्यात
प्यायला
ती चंद्रचांदण्यांची गातो कशास
गाणी
"राणी"म्हणून पाणी..डोळे पुसायला
मांडीवरी सुखाच्या प्यालोच
ना कधी
आमुचेच दु:ख आम्हा आनंद द्यायला
आम्ही जुने खिलाडी गुत्त्यात
या जुन्या
मदिरा आम्हास प्याली उरलोय पाजण्या
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment