आणखी काही कविता
अजुनही कळले ना
----------------
मनभर संध्येचे रंग विखरुन गेला..
अजुनही कळले ना दीप जपला कशाला?..
क्षणक्षण जगलो मी भोगले त्याग केला..
अजुनही कळले ना अर्थ आहे कशाला?..
वणवण फिरलो मी स्वप्नभंगात रडलो..
अजुनही कळले ना प्रीत कळली कुणाला?..
तिळतिळ तुटतो हा जीव कां सांग माझा?..
अजुनही कळले ना भेटलो कां स्वत:ला?..
अविरत करुणेचा स्पर्श शब्दास होतो..
अजुनही कळले ना सत्य कळले कुणाला?..
©रमेश यशवंत वाकनीस©
४/२/१९९९
Comments
Post a Comment