आणखी काही कविता
रंग
----
पोपटी पंखात माझ्या
रंग हे भरले कुणी?..
आसवांचे गीत माझे
चोरले सांगा कुणी?..
मंद ही ढळतेय संध्या
थांबला वारा इथे..
"दूर कां लोटून जाता?"
बोलले नुकते कुणी..!!
ती घरी जाता बिलगते
हासुनी तान्हे तिचे
"कां पितो?-कोणास सांगू
हा भरा पेला कुणी..!!"
मोडले घरकुल त्यांची
काय ही झाली दशा
मी दिशा दावू कुणाला?
प्रीत द्या माझी कुणी..!!
ओढ या मातीस आहे
ठाव आकाशा तुला
भोग आपुल्या प्राक्तनाचे
भोगण्या आला कुणी?..
©रमेश यशवंत वाकनीस©
२२/१२/१९९२
Comments
Post a Comment