Posts

Showing posts from December, 2025

आदि मंगल.. मध्य मंगल..! १.

कादंबरी  ---------  आदि मंगल..मध्य मंगल..!  लेखक : रमेश यशवंत  -----------------------------------  ० हे महासिद्धा..!  मला संबोधी प्राप्त होईल, अशी एखादी कथा सांगून  उपकृत करशील काय?  मुमुक्षुचा हा प्रश्न त्या महाशून्यागारात किती वेळ तरी घुमत राहिला.मग प्रगाढ शांततेला चिरत एक आवाज त्याच्या कानावर पडला- "कथा ऐकून संबोधि प्राप्त होत नाही..!  " मग? "  "रोकडा अनुभवच घ्यावा लागतो त्यासाठी..!  " मी तयार आहे..! "  " शंभरातले नव्याण्णव मुमुक्षुंना असेच वाटते की आपण अध्यात्मिक जीवनास पात्र आहोत.पण ते पात्र नसतात.."  " ही पात्रता ओळखायची तरी कशी? "  " प्रत्यक्ष मार्गक्रमण करतानाच ते कळू शकेल.  तुला आतून ' साद ' ऐकू आलीय कां?"  "हो, म्हणूनच तर या शून्यागारा पुढे येऊन प्रश्न केलाय.."  " मग डोळे मिट ऐक आणि पहा.."  - शांत सरोवरावर काठावरच्या एखाद्या वृक्षाचे फळ पडावे आणि वलया मागून वलये उठावीत तशा प्रसंगांची मालिका डोळ्यापुढे सरकू लागली..शब्दांचे ध्वनि त्याच्या अंतरात्म्यात घुमू लागले.. १. खळदंग..खळदंग..खळदंग..ख...

ललित

शेपूट अख्ख्यान ------------------  शालेय जीवनात वक्तृत्व स्पर्धा म्हटली की सरांनी भाषण लिहायचे आणि सहभागी विद्यार्थ्याने ते तोंडपाठ करुन परिक्षक व विद्यार्थी-श्रोत्यांपुढे उभे राहून ठोकायचे असाच त्यावेळेला प्रघात होता.एकदा ' मी कोण होणार? ' या विषयावर स्पर्धा होती.सरांनी भाषण लिहून माझ्या हातात सोपवले होते खरे पण त्या भाषणात मला काय व्हावेसे वाटते हे सरांनीच ठरवून टाकले होते.म्हणजे मला आरामात टांग्यात बसायला मज्जा वाटायची मला सरांनी टांगेवाला बनवले होते.आमच्यावेळेला पुण्यात ' बाबू टांगेवाला ' अतिशय प्रसिद्ध होता.'सकाळ' सारख्या दैनिकातून तो प्रसिद्ध झाला होता.त्यावरुनच मला टांगेवाला व्हावेसे वाटत असणार अशी सरांची खात्री झाली असावी.टांगेवाल्याचे भूत मानेवरुन उतरल्यावर भाषणातल्या ' मला ' पोस्टमन व्हावेसे वाटू लागले आणि सायकलवर टांग मारुन घराघरात मी कशी पत्र वाटत फिरेन,वाचता येत नाही त्यांना त्यांची पत्रे कशी छान वाचून दाखवेन,अशा स्वप्नात रंगून गेलो.स्वप्नातून बाहेर काढून मग सरांनी मला सैनिक बनवून राष्ट्ररक्षण करायला सीमेवर पाठवून दिले.तिथे काय झाले कोण जाणे...