आणखी काही कविता
लाल परी
-----------
मनात येऊन छळू नको
श्वासांवरती फुलू नको
वेड प्रीतीचे लावित तू
खुदकन् गाली हसू नको
नाव कशाला तुला हवे?
गाव कशाला तुला हवे?
उगाच माझा पत्ता तू-
शोधित इथवर येऊ नको
डोळ्या मधले डोळे तू-
काढुन घे ना तुझे जरा
ओठा मधले ओठ तुझे
अमृत भरले मला नको
काळ राहिला मागे तू
नवीन धागे जोडित जा
लाल परी तू निळ्या नभी
विहार कर ग थांबू नको
©रमेश यशवंत वाकनीस©
Comments
Post a Comment