आणखी काही कविता
चाफा
-------
पुन्हा पुन्हा तुझ्याकडे वाटे पहावेसे
आज सख्या तुझ्यातच वाटे विरावेसे..
देह-मन तुझ्याकडे उडू उडू पाहे
सांग किती दूर तुझा गाव तरी आहे
ऐल आणि पैल मधे धावते ही नदी
नदीलाही कां रे दिली सागराची व्याधी?..
ये ना पुन्हा चाफ्यातळी सुगंधात न्हाऊ..
फुले त्याची पाने त्याची कळ्या त्याला वाहू..
लोक अपवाद जरी असला असू दे
गैर तरी प्रीत खरी मुक्त उधळू दे..!
©रमेश यशवंत वाकनीस©
२६/८१९९२
Comments
Post a Comment