Posts

Showing posts from October, 2023

सहज सुचलं म्हणून

सहज सुचलं म्हणून ------------------------- 'वेदमंत्राहून आम्हा वंद्य..' गदिमांचे हे गीत काव्य म्हणजे 'वंदे मातरम्' या कवितेचा महिमा गाणारी ललितकृती आहे.गदिमांना वंदे मातरम् या राष्ट्र गीताचाच महिमा कां गावासा वाटला?-वेद मंत्राहूनही वंदे मातरम वंदनीय आहे असे ते कां म्हणतात?- असे प्रश्न स्वत:लाच विचारले तर त्याचं उत्तर भारतीय स्वातंत्र्य समरात मिळतं.बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी ही कविता त्यांच्या 'आनंद मठ' या कादंबरीतील एका प्रसंगाचा परिपोष करण्यासाठी लिहीली.ब्रिटीश अधिकारी आणि धनदांडगे जमिनदार गरीब जनतेचे करीत असलेल्या शोषणा विरोधातल्या या कादंबरीवर नंतर चित्रपटही निघाला.कादंबरीत आणि चित्रपटात हे गीत विद्रोही संन्यासांच्या तोंडी घातले आहे.बंकिंमचंद्रांच्या या कवितेने इतिहास घडवला.ब्रिटिशांच्या विरोधात तरुण क्रांतीकारक अगोदरच पेटून उठले होते.या गीताने स्वातंत्र्य समराच्या यज्ञातील ज्वाला आकाशाला भिडू लागल्या.ब्रिटीश शासन हादरून गेले.वंदे मातरम् या कवितेवर बंदी घालण्यात आली पण त्याचा परिणाम उलटाच झाला.अबालवृद्धांच्या तोंडी त्यावेळी अपौरुषेय वेदातील मंत्रांपेक्षा,...