आणखी काही कविता

मनात घर केलेस ६६
आता घरात
मन रमत
नाही..
धाव घेते भेटीसाठी..
पाऊल बाहेर
पडत
नाही..
तसे कुठे कधीच
काही 
अडत
नाही..
पण-
'पण' जिंकणे
जमत
नाही..
हरले तरी
हट्टी, लोभी..
हरले कबूल
करत
नाही..
आपली खेच
आपलाच पेच..
पेच काही
सुटत
नाही..
मनात घर केलेस
आता घर..
घरात मावत
नाही..
*घर*
© रमेश यशवंत वाकनीस©
१५/७/२०१९ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७