Posts

Showing posts from July, 2026
भाच्चा रमेश.     मित्र रमेश.    गुरु रमेश. माझी रमेशशी पहिली ओळख आक्कानी "हा तुझा मामा बरका" अशी करुन दिली. त्यावेळी ते नव्या पेठेत वर्धमान भवनमध्ये रहात होते. त्यावेळी दिवाळी सुट्टीत आम्ही नात्यापुत्याहून आलो होतो. मग नंतर नेहमीच आम्ही सवड मिळाली की एकमेकाकडे येत असू. रमेश आठवीत होता त्या वेळेस अंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत त्याला १ ले बक्षीस मिळाले.ते भाषण आकाशवाणीवर प्रसारीत झाले. त्याच्या सांस्कृतिक धडपडीचा पहिला धडा  ह्या त्याच्या नभोवाणी कार्यक्रमानी त्याला दिला. मग त्याची बालनाट्यात चळवळ सुरु झाली. पुढे त्यानी एका बालनाट्याची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. "भस्मासुर"त्याचं नाव.  त्याच्या ह्या स्थित्यंतराच्या काळात मी त्याच्या नेहमीच सोबत असे. त्या काळी डेक्कनवर फिरायला जाण्याची फॅशन होती. एकदा डेक्कन वर बसस्थानका शेजारी दुकाना बाहेर पाच रुपयाची नोट रमेशला सापडली. त्या पाच रुपयांवर आम्ही आठवडाभर यथेच्छ चैन केली. ही बातमी आक्काला कशी समजली कोण जाणे. त्या मूळे आम्हाला जबरदस्त ओरडा खावा लागला. असेच एकदा माझ्या मुंजीत सगळी भाच्चे कंपनी नात्यापुत्यात आमचे...

पाॅडकास्ट

प्रकट मुलाखत  -------------------- १प्रश्न : सर्व प्रथम...आयुष्याकडे उत्तर :  -मोहाच्या नव्या क्षणाला  मी जिवंत इतुका होतो  जगणारा हजार वर्षे  लाजेने मोडुन पडतो.. २प्रश्न : तुमचं नांव घेतलं लोकांना   कवी..नाटककार..दिग्दर्शक अशा अनेक ओळखी आठवतात पण रमेश वाकनीस स्वत:ला कोणत्या एका शब्दात ओळख करुन देतील?  उत्तर : सहृदय व स्वत:शी प्रामाणिक माणूस  प्रश्न : लहानपणीचं घर.. आई वडील.. वातावरण..त्या काळातल्या कोणत्या आठवणी अजूनही मनात जिवंत आहेत?  उत्तर : खूप म्हणजे खूपच आठवणी आहेत.आम्ही टिळकरोड न्यू इंग्लीश स्कूलच्या मागे वर्धमान भवन या वाड्यात रहात होतो.माझं ६ वी पर्यंतचं शिक्षण तिथेच झालं.लपंडाव,डबाऐसपैस,वगैरे खेळ इथे चालायचे. चौथीत असताना एक दिवस काही तरी कारणावरुन माझ्या मित्रानी मला मारलं मी रडतरडत घरी गेलो वडील म्हणाले- " त्यानी मारलं तर तुझे हात काय केळी खायला गेले होते कां? " आई म्हणाली," हा सुद्धा काही कमी नाहीय.यानंच खोडी काढली उगाच कोण कशाला मारेल? "  या दोन वाक्यांनी माझ्यावर महत्वाचा संस्कार घडवला.दुसऱ्याच्या दोषांकडे एक बोट दाख...