आणखी काही कविता

लावणी
---------
चंद्र प्रीतीचा नभात फुलला
फुलला मनमोगरा
साजणा हात धरा सावरा तोल हा..
ऋतुबहराच्या पहिल्या वेळी
धुंद बहरल्या होत्या वेली
त्या वेलीच्या फुलाफुलावर
जीव जडवुनी पहाऽ साजणा..
आकाशाच्या छायेसाठी
या मातीने पदर पसरला
पदरी घालुन नक्षत्रांची
बाग तृप्तीने नहाऽ
साजणा हात धरा सावरा..
©रमेश यशवंत वाकनीस©
२२/१२/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७