Posts

Showing posts from August, 2025

कविता

रंगत ------ सोबत नाही संगत नाही जीवनात या रंगत नाही..! विश्वासाला चूड लागली पण नेकी ही भंगत नाही..! चलनीनाणे नाही जवळी मग बाजारी किंमत नाही..! नाचविल्याविण बाया येथे उत्सवात या गंमत नाही..! लोकांताचे क्षणभंगुर सुख एकांताला दंशत नाही..!! ©रमेश यशवंत वाकनीस २०/८/२०२५

धम्मपद निरुपणमाला

'धम्मपद' निरुपणमाले विषयी थोडे मनातले :- --------------------------------------- समग्र बुद्ध वाड़मय म्हणजे एक महासागर आहे.त्यातला 'धम्मपद' हा ग्रंथ बौद्ध धर्मियात अतिशय पवित्र मानला जातो.' धम्मपद' म्हणजेच सिद्धार्थ तथा बुद्धाची विखुरलेली वाणी.त्याच्या महापरिनिर्वाणा नंतर ही वाणी अनेक शिष्यांनी संग्रहीत केली.हे काम अनेक शतके चालले व ग्रंथ सिद्ध झाला.'धम्मपदात'एकूण २६ वग्ग (वर्ग)म्हणजे अध्याय आहेत.एकूण ४२३ पदे किंवा श्लोक आहेत.प्रत्येक पदामागे अट्ठकथांची(अर्थकथांची)पार्श्वभूमी आहे.बुद्धाने कोणत्या प्रसंगी,कोणाला,कुठे उपदेश केला हे या अट्ठकथांमध्ये समजते.या सर्व पदांचा मी २०/२५ वर्षांपूर्वी सुलभ मराठीत अनुवाद केला.पिंपरी चिंचवड साहित्य मंचावर ज्येष्ठ साहित्यिक,व्याख्याते मा.राजेंद्र घावटे यांनी 'लिहीते व्हा' असे आवाहन केले.ते वाचून मला प्रतिसाद द्यावासा वाटला आणी या निमित्ताने 'धम्मपदां'वर निरुपणे लिहावी असे मनात आले.मनात येणे वेगळे आणी प्रत्यक्ष हे शिवधनुष्य पेलता येणे वेगळे.पण प्रयत्न करुन पाहतो आहे.होऊन होऊन काय होईल?फसेल प्रयत्न.समूहावरी...