आणखी काही कविता

तुझ्या शिवाय
----------------
तुझ्या शिवाय करमत नाही
सूर ताल धरवत नाही
तुझ्या शिवाय आयुष्याची
मैफल काही रंगत नाही.
बाजार मांडून बसलेल्यांचा
शेजार मला खपत नाही
एकटा तर लढतोच आहे
एकेकट्याचा मृत्यू मात्र
माझ्याच्यानं बघवत नाही.
सुखाचं एक समजू शकतो
दु:ख कसे वाटून घेतात?
फसव्या शब्दात फसवे आधार
शोधत राहतात..
अजब आहेत इथले लोक
कसे जगतात कळत नाही.
तू येतेस अश्रूंचे इंद्रधनू
डोळ्यात घेऊन,सहजच
जातेस गाऊन..
तुझ्या शिवाय आयुष्याची
मैफल काही रंगत नाही
तुझ्या शिवाय करमत नाही.
©रमेश यशवंत वाकनीस©
२४/७/१९९९ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७