आणखी काही कविता

एका ओळीच्या शोधात
-----------------------------
आता सखे तुझ्यामाझ्या
मधे काही नाही
होती प्रीत होते गीत
आता तेही नाही
होते एक गाव त्याचे
शहर जाहले..
पानाफुलांचे बहर त्यात
कोळपून गेले
भाव रुपयात सांग
लाव ह्रदयाला काडी
ज्याला त्याला हवी इथे
दारा पुढे घोडागाडी..
मागे वळू नको आता
फार पुढे पाहू नको
थांब. क्षणासाठी उगा
युगे युगे धावू नको
किती सोसशील कळा
किती मारशील हाका
जन्माआधीच मृत्यूचा
घालायास शीक टाका
तुझे झाले ध्रुवपद
माझा जाहला अंतरा
एका ओळीच्या शोधात
फिरे गरगर भोवरा
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७