आणखी काही कविता

शून्य धडा
-------------
गुंतले ओठात ओठ साजणाचे
दव पापण्यांचे ढळेनाच
ढळेनाच ऐशा दु:खाचे हे सुख
अंतरीची भूक सरेनाच
सरेनाच काही केले तरी भोग
योग देह-त्यागे घडेनाच
घडेनाच ऐसा घडा अस्तित्वाचा
पुन्हा शून्य धडा गिरवावा
©रमेश यशवंत वाकनीस©
१८/३/१९९२ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७