आणखी काही कविता

गुहा
----
कुणी कशाला सांगावं मला
हे सोड न् ते सोड
अमुक जोड न् तमुक तोड..
धर-सोडीत आणि जोड-तोडीतच
आयुष्यानं आकार घेतला
काही स्वप्नं साकारली.
जी राहिलीत अपूर्ण,
ती निराकारानं ओंजळीत टाकलीत..
ती पहात बसावे तर,
शब्द सापडत नाहीत..
आकार मिळत नाही,
मिळाला तरी हा- "तो" नाही
असंच वाटत राहतं.
मग तिळतिळ तुटत राहतो
फक्त जीव..
कधी तरी या तुटणाऱ्या जीवाचाच मंत्र होईल आणि हजारो वर्ष
बंद असलेल्या या गुहेचं दार
एकदाचं उघडेल..
©रमेश यशवंत वाकनीस©
९/१२/१९९९

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७