आणखी काही कविता

सखी १३
------
सखी नाही आली तर
गाणे म्हणायाचे नाही
अशा गाण्यातले दु:ख
तिला सोसायाचे नाही
तिचे नक्षत्रांचे देणे
नाही सहज इतुके
घ्याया हातात विस्तव
मागे सरायाचे नाही
तुझ्या स्वप्नातली प्रीत
तिने फुलवली आहे
तिची फुलवाया बाग
आता फुलायाचे नाही
तिच्या अश्रूत दडल्या
किती जन्मांच्या कहाण्या
एका जन्माचे हे पान
पुरे पडायाचे नाही
तुझ्या ओठावर आहे
तिच्या येण्यातील गाणे
ऐक.शब्दाने कोरड्या
उर भरायाचे नाही.
©रमेश यशवंत वाकनीस©
१/१२/१९९३

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७