Posts

Showing posts from June, 2019

४२ धागे

तटातटा तुटोनी गेले विणताच जिवाचे धागे गऽ शिणलो आता सखये मी कशास पाहू‌ मागे?..||ध्रु|| लक्तरे टांगुनी आता मी वेशी वरती गावे.. गावातुन वस्त्त्रासाठी कां दारोदार फिरावे?.. डोळ्य...

४१प्रवास

. रिक्त हस्त आला जो तो  रिक्त हस्त जातो.. सोडुनी प्रवासी कुठल्या प्रवासास जातो..||ध्रु|| भोवती तमाच्या दाही दिशा हासताती..  पाय पुढे पडती मागे भुते लागताती..  कुणाला कशा या वाटा गाठती पहातो..||१|| निळ्या सावलीला आहे अपाराचा पार..  दु:खभोग कोणासाठी सौख्य अनिवार..  घडायचे घडते आहे कोण रोधू शकतो..||२|| मरण सोबतीला आहे इथे जन्म-जात.. दोन किरण बघण्यासाठी दीर्घ काळरात..  शोध अगम्याचा घेता अगम्यची होतो..||३|| © रमेश यशवंत वाकनीस© ४/१०/१९७६

४० हळू शिंपला मिटवावा

सरुन जाईल रात सखे पण आठवणी या सरतिल कां?.. तुझ्या नि माझ्या दिव्य प्रीतीचे स्वर्ग धरेवर वसतिल कां?.. अजून आहे अंधाराचे सावट कां अवती भवती?.. श्रीमंती बघ लेक पोसते गरीब रोगट वां...

३९ अंत

थांब थोडी जायची ही वेळ नाही.. मेळ आहे दो जिवांचा खेळ नाही.. अर्थ आहे जागृतीला तोवरी घे.. झोप माझी कूड ही सर्वस्व नाही.. स्पर्श आहे जीवनाचा भास नाही.. जन्म नाही मृत्यूचाही फास ना...

३८फुलुनी नमावे

आलो इथे मी आनंद द्याया मी का धरावी माझीच छाया?.. सारे ऋतू हे माझ्याचसाठी मी बुलावे वसंतास द्यावे?.. फुलवेल तेंव्हा फुलुनी नमावे वठवेल तेंव्हा वठुनी हसावे.. मातीत आलो मातीच ह...

३७ गौळण

हिरवी पिवळी गौळण चाले ठुमकत ठुमकत वाटेत भाळावरच्या कुंकुम तिलका धनी हासतो तोऱ्यात.. कुठे चालली पुसता म्हणते काय करावे तुम्हास- गौळण मी हो घड्यात माझ्या दह्या दुधाची बर...

३६ क्षण

हिरव्यात उभे असताना हळूहळू गारवा येतो हासून सुगंधा नेतो अन् श्वास खरा हा होतो..! उमलत्या कळ्यांच्या संगे निर्माल्य होऊन जातो आजचे कालचे सारे मी श्वास तुला कां देतो?.. मोहा...

३५ शेला

उतरली उन्हे हा वर आला एकांत.. पाऊले थांबली हातात देऊनी हात.. सावळ्या नदीची अभंग तृष्णा वाहे.. खडकावर कोणी तशीच व्याकुळ आहे.. हिरव्यात गारवा नाचून हासतो मंद.. हा कुण्या जिवाचा ...

३४ थाळी

ऐन दुपारी झर् झर् बरसत श्रावण बरखा झाली रवी हासुनी पहात दडला कुठल्या मेघा खाली?..||ध्रु|| हरित मनोहर समोर सुंदर ही झुडपांची राई.. मधे धावती नदी कडेने गुरे- वासरे घाई.. टच्च सावळ...

३३ चौकट

शीळ घालुनी मारुन डोळे निघून गेले.. चौकटीतले नटवे डोळे रुसून गेले..! आज असे कां कुणीच येथे फिरकत नाही..! रात चांदणे पसरुन आहे बरकत नाही..!  कुठे कुणाची माया अडते कुठे कुणाचे मोह.. ...

३२ होळी

बोंबलू नका चव्हाट्यावर होळी असली म्हणून काय झाले? गोळी लागून सांगा बरे- 'गोरे साहेब' किती मेले?.. नुसती लाकडे पेटून उठली- म्हणून काय झाले?.. सांगा बरे ह्रदयात नंदादीप किती उजळ...

३१ सुंदर

आधीचे जर दिवस धुक्याचे तर नंतरचे कुठले? नंतरचे जर दिवस उन्हाचे तर आधीचे कुठले?.. आधी होते लाल कबूतर नंतर झाले काळे आता होईल शुभ्र धवल नि क्षणात होईल पिवळे..! वाळू मधले शंख शिं...

२९ धन्य

खुर्ची नि टेबल काहीही खपेल कपाळी लेबल येथे थुंका सांगाल तेथला कागद हालवू ताकद दाखवू लाचारीची वाट्टेल त्या तिथे वाट्टेल ते खाऊ वाट्टेल ते लेऊ आनंदाने जपू जिवापाड ऐसे ब्रीदवाक्य अशक्य ते शक्य करावया रांडेहून थोर येथला व्यवहार पगारही वर बक्षिसीही कोणतीही'शाही'अण्यागिनिवारी मोडीत काढतो हमखास नसू द्या किताब आम्ही ते नबाब चोदवू रुबाब सर्वठायी मालकही धन्य चालकही धन्य आम्ही अहंमन्य कर्मचारी

२८ परी पाऊले

तुझी नि माझी वाट वेगळी परी पाऊले चुकली ग.. दोन पाखरे बघता बघता प्रेम कराया शिकली ग.. पहिल्या वेळी पहिलीवहिली संध्याराणी हसली ग.. इंद्रधनूचे स्वप्न घेवुनी कायमची ती फसली ग.. स...

२७ दुभंग

काय मी करावा जनांचा उध्दार जाहलो गद्दार पांडुरंगा. सुखासाठी माझ्या हपापलो किती सोडली मी नीती पांडुरंगा. त्वचेपरी साऱ्या दोषा चिकटलो कशाला हा घोषा पांडुरंगा.

२६ चाड

पाहिजे आम्हास सुध्दा चाड काही गांड कां होते अशी हो तोंड नाही? भोगण्या मादी हवी कां ही हजारो लागली पोरे भिकेला काम नाही? धूत ही वस्त्रे‌ कपाळी गंध आम्ही- झोपड्या नाल्यात ब...

२५ मध्यान्ह होत असताना

कवटीच्या मध्यभागी सूर्य उगवताना मी पहात असतो हिरव्यागार झाडांचे स्तूप थंडपणे उभे असलेले.. वारुळात मुंग्या जमा होऊ लागलेल्या असतात एखाद्या झुरळाचे प्रेत घेऊन सर्वां...

२४ रांगोळी

धुके असते प्रचंड ताणलेल्या कॅनव्हास सारखे एकसंध तंतोतंत जुळणारे पहिले चित्रं दुसऱ्या चित्राशी बसून गूज गोष्टी करीत असते.. त्याचवेळी कधीतरी कालबाह्य झालेला एक ठिपका ...

२३ यंत्र

यंत्र  -------  ढीगभर दु:खे विणारे यंत्र आले अन् घरट्यात साऱ्या गात आले.. आंदणे देऊन गेले बापजादे- शेत हे खाऊन कु़ंपण मस्त झाले.. जे मिळाले तेच खावे रोज प्यावे  फुंकण्या येथे उकिरडे मोप झाले..  शौर्य मी माझेच आता काय सांगू भोगण्या सारी सुखे हे क्रौर्य आले.. प्रेमही विसरुन गेलो व्यायली कां? रोधण्या माता कुणाची अश्रू ढाळे..! ढीगभर दु:खे विणारे यंत्र आले‌.  * ©रमेश यशवंत वाकनीस 

२४ खेळ

मी निवांत तू निवांत न् निवांत सांज ही चालला अनंत खेळ खेळियात तीन ही.. रंग संग दंग होत भंग होत काजळी मस्त चुस्त या हवेत थंड होत काहीली.. रक्तरीत मुक्त होत रिक्त होत हे घडे.. झाक...

१८ वारी

वारी ------ वाळवंटी चंद्रभागा  एकटी रे राहिली सांग कोणी पांडुरंगा  पंढरी ती पाहिली.. सत्य पडताळून आले थांबले घाटावरी वाहूनी गेले तयांच्या साक्षीला ही राहिली... हा तुक्या ज्ञानेश्वराचा घोष येथे चालला ज्ञान गेले साथ त्यांच्या ही अडाणी राहिली..! पंचप्राणातून साऱ्या वादळे घोंगावती शांतीच्या उंबऱ्यात गर्दी  माकडांची जाहली..! मरण झाले स्वस्त आता आर्त टाहो ऐकण्या पत्थरांची भोवताली राऊळे ही माजली..! व्यर्थ आलो,व्यर्थ गेलो घेवूनी आयुष्य का? ही दिशाहीन आज कोठे सांग वारी चालली?.. कां दिसावी पांडुरंगा पंढरी ती सांग ना- शोषितांनी शोषकांची 'संस्कृती' जर तारीली..!!! ©रमेश यशवंत वाकनीस ('पूर' या पहिल्या संग्रहातून)

२२ गीत

धुंद आहे वादळाची रात्र माझ्या भोवती हे क्षणाचे जन्म आणि मी क्षणाचा सोबती ||ध्रु|| शांततेचे पान कोरे गळुन पडते सारखे गार हिरवे झाड होते सावलीला पारखे काल होते जे फुलांचे त...

२१ गाव

दे दान सुटे गिरान म्हणत फिर गावभर.. लाज सोडून जिरव खाज हास वरती तोंडभर.. उघड्यानागड्या घरट्यांमधून नर चढतायत मादीवर.. तुझ्या सारखी पोरे अरे रोजच येतायत रस्त्यावर.. बघतोस क...

२० जाग

झोपेत कोणी येऊन गेले आठवून बघता इतुके कळाले देणे कधीचे मागून गेले ..! उघडून दारे जवळी बसून हिशोब सारा मज दाखवून उसने दिलेले दे रे म्हणून देणे कधीचे मागून गेले..! आप्तेष्ट ना...

१९ मोळी

टाकून द्या हो मोळी आता पाण्यात पहात बसू नका मरण समोर आले म्हणून जन्मावरती रुसू नका. घुमतो आहे आत बाहेर फुटका घडा जोडू नका सारे सोडलेत ज्याच्यासाठी त्याला आता सोडू नका. आज ...

१७ इरसाल

इरसाल ----------- रोजच्या मरणाचं सोयरसुतक आता राहिलं नाही नवीन जन्मा विषयीचं औत्सुक्यही आता संपलं आहे. देह-मनाला कसं मस्त बाधीर्य येत चाललंय.. आता, आता मला वाटतं जगता येईल, अवतीभवतीच्या दु:खांचा त्रास होणार नाही उलट त्याचं भांडवल करता येईल कवितांसाठी, माझ्या सुखासाठी. त्यालाच मग म्हणतील कुणी नवी जाणीव..क्रांतीचं तवज्ञान.. वगैरे..वगैरे..वगैरे.. मग पुरस्कार.. पैसा..प्रतिष्ठा.. येईलच की मागून.. हंऽ काही हरकत नाही- बगला वर करण्याचं तत्वज्ञान आहेच की- कर्ता करविता तो..!!! च्छ्याऽयऽलाऽऽ ©रमेश यशवंत वाकनीस  ('पूर' या पहिल्या संग्रहातून)

१६ शून्य

नापिक जमीन पिकते आहे आकाशाला विकते आहे शून्या मधून शून्य कुठल्या प्रवासाला निघते आहे?.. मागे पुढे कुणीच नाही तरी कोण दिसते आहे? आपली ज्योत आपल्यातच मोठी होवून विझते आहे..! काय आहे,कसे आहे.. न भेटताच कळते आहे विस्मृतीच्या गर्दितही एक स्मृती छळते आहे.. इथे यायचे कुठे जायचे जरी वाट दिसते आहे जायचे नाही यायचे नाही असे ठिकाण कुठे आहे?.. शोध नाही बोध नाही जिथे फक्त मोद आहे निरामय असा प्रदेश आकारांचा होतो आहे.. शून्या मधून शून्य आता प्रवासाला निघते आहे..

१५ वसंत

या एकाकी अंधारात भिक्षेचे पात्र होऊन‌ बसू नकोस.. ठाऊक आहेत अपराध मला कळ्यांचे आणि फुलांचे सुध्दा.. पण हे निरपराध मुला, तुझ्यासाठीच आलेल्या या वसंताला..हृदयातून कायमचे हद...

१४ वाट

संध्याकाळ झाली सखे.. पाखरे उडून चालली... उमरभर स्वप्नं बघितली.. ती ही निघून चालली..! भेटलो कां?..बोललो कां? अश्रू ढाळावे कशाला?.. कोण आहे आपले इथे.. नाती तुटून चालली..!! काय केले?काय मिळ...

सावली

कौतुकाने बोलतो नि कौतुकाने ऐकतो भेटला तो देव-माझा घेवूनी मी नाचतो आंधळा बहिरा असो की मुका वा पांगळा माणसाला माणसांचा लागला आहे लळा हार-बुक्का ना फुले हा माणसाला मानतो न...

धून

रंग बावरेसे ऊन माझ्या गळ्यातली धून नव्या गीतासवे ऋण वाहे माती-पाण्यातून स्नेह पाझरु नजर आहे आनंदात चूर वाढे कासवीचे पिलू असे रा हूनिया दूर असो भले-बुरे जग आता जगायचे आह...

खरे

आता थोडे हासायाला येते आ णि रडतोही सरणाशी बसोनिया उब तिची मागतोही उब तिची मागताना देतो-घेतो कलेवरे जगणारी जगतात माझे सोंग होते खरे माझे सोंगे होते खरे आणि तिची होते रा...

उरून राहते आहेस

११ साऱ्या चुका पोटात घातल्यास अजूनही घालते आहेस धरला हात झिडकारुन पुन्हा जवळ घेते आहेस कां ग अशी करते आहेस? मला भरुन सरते आहेस पुन्हा उरुन राहते आहेस वेड लावून जाते आहेस ...

स्पर्श

९ स्पर्श हुशार एखादा कावळा असतो चारचौघात उठून दिसतो मेल्या नंतर म्हणून त्याच्या - पिसालाही भाव येतो बाकी रक्त सांडणाऱ्यांनो तुमची देखील कमाल आहे.. आम्ही हाडे वाळवित फि...

आणि इतर कविता..क्रमश:..

४ एक संध्या.. एक संध्या अशी सुध्दा रक्तकमळ प्रकाशाची..क्षितीज केसाळ गुहांची..थोडी उडणाऱ्या पाखरांची.. आणि नंतरच्या - असीम अस्मितेच्या दागिन्यांनी मढलेली उरात विलक्षण गढ...