आणखी काही कविता
उल्का उल्का
----------------
गिरवित बसलो नाव सखीचे
डोळ्या मधले ढळले गीत
आठवली ती प्रीत पुन्हाऽऽ
पुन्हा आसवे बसलो पीत..
मऊ उन्हाच्या पायाघड्यांवर
तिची पाऊले फुलवेडी..
फुलवेडी ती मनात माझ्या
उमलत वदली,"हो ना धीट..!"
हवाहवासा स्पर्श तिचा तो
हर्ष नभातुन मावेना..
म्हणून झालो मीच नभाचा
पैल किनारा हर्षातीत..!!
"अंतराळ ती उल्का उल्का
ओळ कवीची चुटपुटली..
आणि सुखाच्या कातरवेळा
दु:खच बसल्या धुंडाळीत..!!"
©रमेश यशवंत वाकनीस©
१९/१२/१९९२
Comments
Post a Comment