आणखी काही कविता

गुपित ७
-------
पहिले चुंबन जिथे घेतले
तिथले हिरवे गाणे उरले
श्वासामध्ये श्वास मिसळले
भास सभोती त्याचे उरले..
ज्या हातावर नांव कोरले
त्या हातावर ह्रदय उतरले
त्या ह्रदयाचे या ह्रदयाला
सारे काही कळत राहिले
कळत राहिले तरी नकळले
असेच काही मागे उरले
शोधित जाता वळणावरती
उघड गुपित ते हसत राहिले
©रमेश यशवंत वाकनीस©
२९/६/२००७ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७