आणखी काही कविता
प्रेत
----
थोर त्यांचा शब्द ज्यांनी रोज पैसा फेकला
मी करंटा हाय! त्यांचा शब्द नाही झेलला
लौकिकाचा हा पसारा शेतसारा मागता
मेहनतीचे काय माझ्या?माज माझा काढता?
थोर त्यांचा माज ज्यांनी रोज पैसा फेकला..
लक्तरांनी लाज माझी मीच होती झाकली
लाज येते आज तीही मीही विकाया काढली
थोर त्यांची खाज ज्यांनी रोज पैसा फेकला..
सांग आता मरण येथे स्वस्त आहे लावले
सर्व प्रेते..पाहिजे कां यातले शृंगारले?..
थोर त्यांचे "प्रेत"ज्यांनी रोज पैसा फेकला
फेकला तो झेलला मी मोल पैशाचे किती?
"माज" आणि "खाज" यांचे प्रेत उरते शेवटी..!
©रमेश यशवंत वाकनीस©
२२/४/१९९२
Comments
Post a Comment