आणखी काही कविता

हास बरं..
--------
काही सुध्दा वाचता येत नाही
तुझ्या डायरीतलं-
असं कां लिहीतोस तू?
धुक्यातून धुक्या पलिकडच्या
उन्हाची तिरीप, एखादी तरी
माझ्या या कोवळ्या पानावर पडेल
म्हणून मी कधीचा प्रतिक्षा करतो आहे..
नित्य जीवनाचं स्वप्नं
तुझ्या एका कटाक्षानं अनित्य होऊन जाईल असं कां तुला वाटतं?
मरणकळा सोसणारा अनिच्छेनेच त्या सोसतो,असं कां म्हणून समजायचं?
डायरीतलं डोकं काढून एकदा
माझ्याकडे पहा आणि हास बरं शाहण्या मुलासारखा...!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
२९/११/१९९९ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७