रुबाया काव्य प्रकारा विषयी थोडेसे
रुबाई : काव्य प्रकारा विषयी थोडेसे ---------------------------------- रुबाई चा शब्दकोषातील अर्थ चार ओळींची कविता.पण अलिकडे 'चारोळ्या' नावाचा प्रकार जो फोफावलाय त्याच्यात आणि रुबाई या काव्य प्रकारात जमीन-आस्मानाचा फरक आहे.रुबाईचा भावार्थ लक्षात घेतला तर हे स्पष्ट होईल.रुह का बयां ,आत्म्याचे वर्णन किंवा आत्म्याचे जीवन विषयक चिंतन,तत्वज्ञान.रुबाईकाराला हे तत्वज्ञान किंवा जीवनभाष्य जितके मिस्किलपणे मांडता आले पाहिजे तितकेच तो जीवनाकडे किती गांभीर्याने व डोळसपणे बघतो आहे हे पण रसिकाला कळले पाहिजे.टोकाची जीवनासक्ती तितकीच टोकाची विरक्ती एकत्र नांदायला लागली की रुबाईकार होण्याची पात्रता अंगी आली असे समजायला हरकत नाही.ही झाली मानसिक तयारी.मग तंत्राचा भाग.श्रेष्ठ रुबाईकार राॅय किणीकरांनी ज्या रुबाया लिहील्या त्या बहूतेक सर्व भूपतीवैभव छंदात आहे.याच्या लयीतच वेदना आणि आनंद यांची अनुभूती येते.पहिल्या दोन ओळीचे यमक आणि त्यापुढच्या दोन ओळीचे यमक वेगवेगळे असू शकते.तसेच पहिल्या-चौथ्या,दुसऱ्या-तिसऱ्या ओळींचे यमकही जुळलेले असू शकते.चारही ओळींचे यमक एकसारखे असू शकते.गझलेचा मतला आणि एक श...