Posts

Showing posts from March, 2024

अखिल हिंदू साहित्य संमेलन

नमस्कार.. अखिल हिंदू साहित्य संमेलन या समूहावर चाललेली चर्चा-वादग्रस्त मुद्दे रोज वाचतो आहे.त्या संदर्भात माझ्या मनातील काही मुद्दे विचारार्थ मांडत आहे. भारतीय साहित्यात अस्तित्वादी,शून्यवादी,स्वच्छंतावादी, वास्तववादी,अतिवास्तववादी,जनवादी,समाजवादी, आंबेडकरवादी,मार्क्सवादी , मानवतावादी असे इझम- अशी भूमिका घेऊन लिहीणारे साहित्यिक आहेत.या सगळ्यात हिंदुत्ववादी साहित्य हा नवा इझम- नवी भूमिका घेऊन लिहीणारे साहित्यिक ते सगळे हिंदूत्ववादी की  हिंदू संस्कृतीत जन्मलेले सर्व 'लिहीते हात' म्हणजे हिंदुत्ववादी साहित्यिक?-स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज पर्यंतच्या साहित्याकडे पाहिले तर यातील बहूतेक सर्व साहित्यिकांनी समाजवादाचीच कास धरली.जेवढे इझम आहेत त्या सगळ्यात माणूस केंद्र स्थानी असावा हे गृहीततत्व आहे.केशवसुतां पासून सुरुवात केली आणि नेमाडे भारत सासणें पर्यंत येऊन थांबलो तर या सगळ्यांना हिंदूत्ववादी साहित्यिक म्हणून स्विकारणार आहोत कां?(यात फक्त पु.ग.सहस्रबुद्धे,पु.भा.भावे ,न.म.जोशी,यांनी हिंदूत्ववादाचा उघड पुरस्कार केल्याचे ठळकपणे आठवते)-मला वाटते या प्रश्नाचा निकाल आधी लावला पाहिजे.जर फ...