आणखी काही कविता

उदयास्त
----------
डोळ्यांना होते कां कधी
नाव-गाव कुठले?
ओठांची तरी होती कां
कधी कुठली भाषा?
मग,
मग कसा मांडला गेला
माझ्या समग्र अस्तित्वाचा अर्थ?
आता-
तुम्ही द्याल दाखले..
माझ्या सांस्कृतिक विकासाचे
ईतिहासाची पाने उलटून..!!
अंधारातून प्रकाशाकडे होणारा
हा प्रवास..
आणि प्रकाशा नंतरच्या अंधारात
हा माझा प्रवेश..
हा वेश,
उतरवून ठेवू म्हणता?
पण- कसा?
भिंतीवरुन पडून खळ्ळकन फुटावा स्वप्नातला आरसा-
तसा? पण-
पण कसा?
असं करा ना, तुम्हीच तुमचे डोळे मिटून घ्या नाऽ
तोवर मी बघतो..
वितळवून टाकता येतात कां
माझ्याच या गाण्याचे हे-
नीलवर्णी उदयास्य..!!
©रमेश यशवंत वाकनीस©
६/६/ १९९३ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७