पुनर्लेखन १७
पिंपरी-चिंचवड साहित्य मंच विजयादशमी निमित्त आयोजित उपक्रम : लिहीते व्हा.. साहित्यप्रकार : कादंबरी कादंबरीचे नांव : आदि मंगल..मध्य मंगल..! लेखक : रमेश यशवंत वाकनीस प्रसारण दिवस : रविवार दि.२७ फेब्रुवारी २०२७ भाग१७ ------------------------------------------- आदि मंगल...मध्य मंगल..! -------------------------------------------- * -आता तू म्हणशील कोण हा मार?-कळेल तुला, जरा डोळे मिटून तर घेशील?- खूप वेगवेगळ्या रुपात भेटतो हा मार..! -मित्रा, ब्राह्मोमुहूर्तावर नेहमी सारखीच जाग आली उठून कुटी बाहेरच्या तलावातील जलाचे दोनतीन हपके चेहऱ्यावर मारले. चेहरा पुसून कुटी बाहेरच्या कातळावर पद्मासन घालून बसलो. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरी, असे विविध प्राणायाम केले आणि डोळे मिटून स्वस्थ बसलो पण काल पहाटे पडलेले स्वप्न, त्यात भेटलेला तो मार काही केल्या मनातून जाईना..एक सारखे ते स्वप्नदृश्य..तोच मार..तेच माझे संतापजनक उद्गार..प्राणायामामुळे त्याची तीव्रता कमी झाली होती पण मनाला एकच प्रश्न छळत होता की कालच्या स्वप्नाचा अर्थ काय समजायचा?- या आधीही मार मला दिसला ह...