आणखी काही कविता
एकदाच
----------
एकदाच
वळून.. डोळे भरुन..
पाहीन म्हणते..
एकदाच
बघून.. साठवून तुला..
आठवीन म्हणते..
माझे सारे
तुझेच म्हणून..
सांगते तुला-
एकदाच
तुझे,तुलाच लुटून..
हसवीन म्हणते..
एकदाच
वळून..डोळे भरुन..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
२४/१२/१९९२
Comments
Post a Comment