मी रविंद्रनाथांची पत्नी ५. माझे रवि ठाकुर शरद ऋतुतल्या आकाशासारखे आहेत.कधी भरुन आलेल्या मेघासारखे.तर कधी उन्हाप्रमाणे शुभ्र.कधी अल्लड चंट मूल.कधी प्रौढ, धीर..गंभीर..! त्यावेळी आम्ही जोडासांकोच्या ठाकुरवाडीतच होतो.ते दक्षिणेच्या व्हरांड्यात एका आरामखुर्चीत बसले होते.मी खाली फर्शीवर बसले होते,त्यांच्या पायाशी. मी त्यावेळी काही महिन्यांची पोटुशी होते.ते खूपच मौज-मजेच्या मूड मध्ये होते.त्यांचा पूर्ण दिवस लेखनकामाठीत गेला होता.संध्याकाळी काय झालं कोण जाणे एकदम व्हरांड्यात येऊन बसले,म्हणाले- " तू ती मैद्याची खूप पदर असलेली मिठाई बनवली होतीस मला खूप आवडते ती.तिचं नांव काय? " " ऐलोझोलो ! " कधी खायचीय सांगा बनवते.." " ऐलो झोलो?" इतक्या सुंदर मिठाईचं इतकं वाईट नांव? " " तुम्ही सुचवा दुसरं एखादं नांव..तेच नांव कायम करु.." " क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले " परिबंध " " परिबंध?-काय म्हणायचा याचा अर्थ? " किंचित हसून ते म्हणाले, केस बांधून जेंव्हा नोतुन बोऊठान समोर येऊन उभी राहिली तेंव्हा तिला एकदा म्हटलं होतं- " क...
Comments
Post a Comment