आणखी काही कविता

राख उडावी तसेच उडले
वाऱ्यावरती शब्द..
करी निखारे घेऊन आलो
घरात मी नि:शब्द..
घरात मी नि:शब्द ऐकला
कोलाहल बाहेर..
प्रेता भवती हंबरडे अन्
सुन्न खिन्न अंधार..
सुन्न खिन्न अंंधार दाटला
फुलत निखारे ठेव..
मरणा मागून जन्म सोहळे
रमले सारे गाव..
*निखारे*
©रमेश यशवंत वाकनीस©
२८/७/२००४




Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७