Posts

Showing posts from August, 2024

रमणीय प्रतिमांच्या विश्वातील प्रतिभावंत कवी : रमेश यशवंत वाकनीस

रमणीय प्रतिमांच्या विश्वातील प्रतिभावंत कवी : रमेश यशवंत वाकनीस  (दै.केसरीच्या 'काव्यलेणे' सदरातील लेख.मुलाखत व शब्दांकन :प्रदीप कुलकर्णी एकाच कवितेचा काही भाग मुक्तछंदात आणि काही भाग छंदोबद्धही असू शकतो? कुणीही म्हणेल नाही.परंतू कवी रमेश यशवंत वाकनीस यांनी ही किमया करुन दाखवली आहे. त्यांच्या 'आकाशा ' या दीर्घ कवितेत त्यांनी हा प्रयोग केला आहे.खरे तर प्रयोग केला असे म्हणता येणार नाही.ही कविता लिहीताना जो आकृतीबंध सुचत गेला तसे लिहीत गेलो आणि एक वेगळीच कविता जन्माला आली.ज्येष्ठ कवी व संपादक पुरुषोत्तम पाटील यांना ही कविता खूपच आवडली आणि ती त्यांनी त्यांच्या ' कविता-रती ' अंकात प्रकाशितही केली. वाकनीस यांना खरे तर नाट्यक्षेत्रात नांव काढायचे होते.तेथे संधी मिळाली नाही म्हणून मग 'नाट्य स्यमंतक' या हौशी संस्थेची स्थापना करुन 'भस्मासूर' हे स्वत:चेच बालनाट्य रंगमंचावर आणले.त्याचे दहावीस प्रयोगही केले.याच दरम्यान 'अॅक्टीव्ह थिएटर' च्या स्थापनेतही त्यांचा सहभाग झाला.अभिनयाची हौस भागू लागली.कलावंतांच्या सहवासात वाकनीसांमधील कवी/लेखकाला प्रोत्साहन ...