आणखी काही कविता

कविता
किती बोलू?काय बोलू?
असे झाले बाई..
सजणाला भेटायाची
सजणीला घाई..!
लाल नेसू,अंजिरी की
पिवळी की निळी?
सारे रंग पाहूनिया जाहली
ही खुळी..!
आरशात पाहते तो
सजणच दिसे..
लाजुनिया चूर होत
मनोमनी हसे.. !
'कोणताही रंग तुझ्या
कांतीवर खुले..'
आठवता शब्द त्यांची
झाली फुलेफुले..!!
फुला फुला मध्ये तिची
हरवली दिठी..
अलगद सजणाची
पडली की मिठी..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७