आणखी काही कविता
अर्धे गीत
-----------
जपले गाणे जपले प्रीत
ओठामध्ये अर्धे गीत
कंचकाळ्या डोळ्याआड
तरळत होते जे संगीत
तेच गाऊनी झालो धीट..
जपले गाणे जपली प्रीत..
मंद मंद तू चालत जा
फुलातुन हासत जा
क्षणैक इथली भूल पडो
तुझ्या चिरंतन व्यामोहात
घडल्या भेटी सुख दु:खात
जपले गाणे जपली प्रीत..
नाव गाव मज ना उरले
शब्द शब्दही हे विरले
मौनाचे आकाश सांडले
ज्ञेय जन्मले अज्ञेयात
पहिल्या वहिल्या अंधारात
जपले गाणे जपली प्रीत
तीच विहरते या विश्वात.
©रमेश यशवंत वाकनीस©
६/२/१९९२
Comments
Post a Comment