प्रवास:सौदी अरेबियाचा भारतीय मनाचा
प्रवास:सौदी अरेबियाचा,भारतीय मनाचा --------------------------------------- ३ सौदी अरेबिया या देशातील यानबु शहरात आलो तेंव्हापासून मला आभुटली सहज बिलगते तशी बिलगली ती म्हणजे इथली प्रसन्न करणारी शांतता आणि स्वच्छता.या देशाची झालेली ही पहिली भेट,पहिली ओळख.मैलोमैल पसरलेल्या प्रशस्त रुंद रस्त्यांवरुन कितीही दूर रपेट मारा.कुठेही,कुठल्याही चौकात फूटपाथवर वडापाव, आईस्क्रीम,पावभाजी,चायनीजच्या गाड्या,त्याभोवती उभे राहून सतत खाणाऱ्या मुलामाणसांची गर्दी दिसणार नाही.सिगारेट ओढणारी माणसं दिसतात पण जागोजागी पानतबाखूच्या टपऱ्या कुठेच दिसत नाहीत.राजकिय नेत्यांचे,स्वयंघोषित भाई-दादांचे चोकाचौकात झळकणारे आणि शहर विद्रूप करणारे फ्लेक्स, सार्वजनिक, धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने रस्त्यातच टाकलेले मांडव दिसणार नाहीत.डीजे वरची कानठाळ्या बसवणारी गाणी ऐकायला मिळणार नाहीत.इथे कानावर पडते ती मशिदींमधून येणारी कर्णमधुर अजान.ती संपली की पुन्हा सगळं शात.इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळ जवळ नाहीच.टॅक्सी दिसतात.पण रिक्षा,टेंपो,सिक्ससीटर,प्रचंड संख्येने धावणाऱ्या टू व्हीलर्स काही म्हणजे काही दिसत नाही.इथे र...