आणखी काही कविता

वाण
-----
मित्रा,
तू खरोखरच फार सज्जन आहेस
आणि हुशार सुध्दा..!
तुझे दुर्गुण तू ,
झाकतोस की संपवतोस आपल्या
सुंदर सुंदर शब्दात?
संपवत असलास तर तुला या आरशाची गरजच नाही.
झाकत असलास तर मात्र-
तुला स्वत:लाच समोर ठेवून ,
ही ज्योत पेटती ठेवायला हवी..
तुला जनाची नसली तरी,
मनाची आहे..
पण तू लाजत नाहीयस.
घाबरतोयस प्रकाशात यायला..!
अरे..! ही ज्योत म्हणजे काही ज्वाला नाही की तुला जाळून तुझं
भस्म करुन टाकेल..!
ती वेळ येई पर्यंत तूच हे प्रकाशाचं वाण वाटत दूर निघून गेला असशील..!!
तुझे पाय कुठायत?
आज मला त्यावर डोकं ठेवायचंय कारण मित्रा ,
खरोखरच तू फार सज्जन..
अरे..!!!
गेलास सुध्दा?.!!!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
१०/३/१९९३ 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७