आणखी काही कविता

मी
----
जन्म सुळावर प्रसवित आलो
मी पाण्यावर लहरत आलो
शंकाकुल कां? कां भयभित ?
मी:स्वर सुस्वर घडवित आले
शब्द.ध्वनीचा मी धांडोळा..
अर्थ स्वत:चा आज उमगला
अनर्थ सारा या विश्वातिल
भोगण्यास मी समर्थ झालो..
नीरव निस्तुळ अक्षय शांती
गाणे माझे : चिरविश्रांती
स्थल कालाच्या पल्याड माझे
स्थान करुन मी निश्चित आलो..
मी : स्वर,स्वर सुस्वर घडवित आलो..
(रमेश यशवंत वाकनीस) 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७