आणखी काही कविता
क्षण कवितेचा
-------------
सांज क्षणांची ढळता ढळता
क्षण संध्येचे उरले मागे
त्याच क्षणांचा होवुन गुंता
सोडवीत मी बसलो धागे.
मागे मागे किती जायचे
काळ सारखा पुढे चालला
बाळखेळणी टाकत टाकत
तरुणाईशी रास रंगला.
रास रंगला.. भास संपला..
खिन्न रुपेरी वृध्द हासला
त्या हसण्याचे गूढ उकलण्या
जन्म मृत्युच्या कुशीत शिरला.
अकाल डोळे मिटुनी वदला
विराट विश्वातील मुलांना
"मी सृजनाचा आद्य स्फोट
मी क्षण कवितेचा..!
क्षण कवितेचा..!!!
©रमेश यशवंत वाकनीस©
६/११/१९९९
Comments
Post a Comment