Posts

Showing posts from June, 2026

ओळख

ओळख ---------  सुखाची वाटते भीती  सुखाला ठाव ना नीती सुखाचे गाव सोडोनी  करू दु:खात या वस्ती..! किती रंगात.. रूपात.. येऊनी भेटली दु:खे-  मला बघताच दु:खाने  रडाया लागली दु:खे..! ! सुखा-दु:खाकडे बघता फिरवली दोघांनीही पाठ..!!! अरे.‌.! आनंदसागर मी..! कधी या घ्यायला गाठ..!!!! ©रमेश यशवंत वाकनीस २१ जून २०२६

आदि मंगल..मध्य मंगल..! २

क्रमश:-२ *   * निळ्या संगमरवरात बांधलेल्या अतिभव्य अशा राजप्रासादामधील महाराज शुद्धोदन व मायावती यांच्या विश्राम महालाला जोडून उभे असलेले अतिथीगृह आज आम्रपर्ण व झेंडूंच्या फुलमाळांनी सजवले दिसत होते.अतिथीगृहात उघडणाऱ्या रत्नजडीत स्तंभावरील कमानी पासून जमिनी पर्यंत गुलाबी रेशमी पडदामंद समीर झुळकांनी झुलत होता.या कमानीच्या बरोबर समोर अतिथीगृहाचे विशाल प्रवेशद्वार होते.प्रवेशद्वाराच्या दोन्ही स्तंभांवर दोन सिंहमुखे कोरलेली होती.त्यांच्या विसकटून उभ्या राहिलेल्या आयाळी इतक्या खऱ्या वाटत होत्या की पाहणाऱ्याला त्यांना स्पर्श करुन‌बघण्याचा मोह आवरला‌ नसता.गडल तांबड्या पाषाणात बांधलेल्या या अष्टकोनी वास्तुच्या भिंतीवर स्वागतातुर नर्तिकांची शिल्पे अशा खुबीने कोरली होती की स्वच्छ सुर्य प्रकाश आणि मोकळी हवा खेळवणारी ती गवाक्षे आहेत हे प्रथम दर्शनी कळूनच येत नाही.प्रवेशद्वारावर उभे असलेले प्रहरी हातात भाले धरुन पहाटेपासूनच विनम्र भावाने अतिथींची प्रतिक्षा करत होते.त्यांच्या लालफेट्यांवरील सोनेरी पट्टे आता प्रात:काळचे किरण पडून चमकू लागले होते.गुबऱ्या गालांचे व काळ्यभोर गलमिशांचे हे तरुण श...

गझल

तयारी --------  जीवन म्हणजे मरावयाची  करा तयारी.. काळ वेळ ही निश्चित ठरली  करा तयारी.. स्वप्ने कांक्षा आशा म्हणते  धावा धावा.. इथले सारे.. इथेच राहील  करा तयारी..  उगा शहाणपण शिकवू नाही  इथे कुणाला.. आपुले ओझे आपण उचला  करा तयारी..  'आहे-आहे' 'नाही-नाही' वाद  कशाला?  मौन सागरी घ्याया डुबकी  करा तयारी..  राखे मधल्या अस्थी झाल्यावर  गंगार्पण.. जन्मजन्मीची यात्रा सरण्या  करा तयारी... ©रमेश यशवंत वाकनीस

मी रविंद्रनाथांची पत्नी११

मी रविंद्रनाथांची पत्नी ------------------------------- ११. मला ते लोक कलकत्त्याच्या जोडासांको वाडीला घेऊन आलेत.या वाडीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात,मुलांना जन्म देऊन त्यांचन पालनपोषण करण्यातच मी मृत्यूच्या दरवाजा पर्यंत आलीय.डोळ्यांनी मी आता नीट पाहू शकत नाही. हात कापतायत. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय.तरी सुद्ध एकदोन गोष्टी लिहायच्या राहिल्यात. या नि:संग धरतीवर मला दोन जीवाभावाची माणसं मिळाली होती- मझ्या दोन मुली, माधुरीलता,म्हणजे बेला आणि रेणुका. गेल्या वर्षी १५ जूनला रवि ठाकुरांनी खूप विचारपूर्वक माधुरीलताला माझ्यापासून तोडलं. तिचा विवाह करुन टाकला. कुणा बरोबर?-तर बिहारीलाल चक्रवर्तींच्या मुला बरोबर. नोतुन बोऊठानचे भक्त होते ना बिहारीलाल.बेलाचं वय  होतं पंधरा. मी रेणूकाला उरीपोटी सांभाळत जगत होते पण बेलाच्या लग्नानंतर नऊ महिन्यातच तिला देखील माझ्यापासून तोडलं. तिचं लग्न केलं अवघ्या दहाव्या वर्षी. कारण बाबा मोशायनी ८ डिसेंबर १८९९ मधे आपले अखेरचे मृत्यपत्र लिहीले होते.त्या मृत्यू-पत्रा प्रमाणे बाबा मोशाय जिवंत आहेत तोवरच मुलींच्या लग्नाचा खर्च जोडासांकोच्या खजिन्यातून होणार होत...

मी रविंद्रनाथांची पत्नी१०

मी रविंद्रनाथांची पत्नी ------------------------------ १०. बलूची मी काकू आई.फक्त काकू आईच होते कां?- तो मला तशी हाक मारायचा.पण त्या 'काकू आई' म्हणण्यात त्याचं प्रेम मिसळून आलेलं असायचं.ठाकुरवाडीत मला कुणीही कधी अशी हांक मारली नाही.मी त्याच्यापेक्षा चार वर्षाने लहान होते.तरीही तो काकू आईच म्हणायचा. बलू माझ्यापेक्षा वयानेच फक्त  मोठा नव्हता बुद्धी,वाचन,लेखन अशा सगळ्या बाजूने‌ मोठा होता.ही गोष्ट त्याच्या व माझ्या नात्यात  कधी अडसर म्हणून आली नव्हती.मी त्याची काकू आई असून सुद्धा त्याचा आदर करत होते.त्याच आदरभावात धीरगंभीर प्रेमाचा भाव मिसळून गेला.प्रेम- जे हृदयाच्या अंतर्हृदयाला साद घालते..ठोके चुकवते.. ते प्रेम.मला फार भिती वाटतीय प्रश्न विचारायची तरी पण‌ विचारतेय- याचंच नांव प्रेम आहे कां?- बलू जेंव्हा माझा हात धरुन लंगड लंगडत चालायचा तेंव्हा असं वाटायचं की त्याच्या शरीरातून माझ्या शरीरात काही अनामिक गोड..हवं हवंसं प्रवेश करतंय.एक दिवस बलूला मी ही गोष्ट सांगितली.तो हसून माझ्याकडे अनिमिष नेत्राने पहात राहिला.माझ्या डोळ्यात डोळे ठेवत त्यानं विचारलं- " काय प्रवेश करतं ठावुक आहे...

मी रविंद्रनाथांची पत्नी ९

मी रविंद्रनाथांची पत्नी ------------------------------  ९. एका माणसाविषयी सांगितल्याशिवाय ही गोष्ट पूर्ण होणार नाही.कारण त्याच्यावर मी खूप प्रेम करत होते.प्रेमाची ही गोष्ट मी कुणाला सांगू शकले नाही.मी कुणावरही अन्याय केला नाही.मी अगदी एकटी पडले होते.किती यातना मी सोसत होते हे त्यानं न सांगताच ओळखलं होतं.समजून घेतलं होतं.म्हणूनच त्याच्यावर जीव टाकला.त्याच्या इतकं प्रेम माझ्या सासुरवाडीत कुणीही केलं नाही माझ्यावर.तो माझ्यापेक्षा चार वर्षाने मोठा होता.मी जेंव्हा नवव्या वर्षी जोडासांको ठाकुरवाडीची सून म्हणून आले तेंव्हा मित्रासारखे पुढे येऊन त्याने माझा हात हातात घेतला.तेंव्हा तो तेरा वर्षाचा होता. अगदी रवि ठाकुरांचे जसे दोन वर्षाहून मोठ्या नोतुन बोऊठान सोबत बंधुत्वाचं,मित्रतत्वाच प्रेम फुललं,बहरलं तसच माझ्याही बाबतीत झालं. ठाकुरवाडीचा हा पुत्र जन्मापासून आजारीच होता.त्याच्या वडीलांनाही सगळे वेडा म्हणायचे.आई सुद्धा त्याचा फार काही चांगला सांभाळ करत होती असं नाही.ठाकुरवाडीत हे लोक जरा एकटे पडल्यासारखेच होते. तो नीट चालू शकत नव्हता.पाय घासत लंगडत  चालायचा त्यामुळे मुलामाणसात मिसळायल...

मी रविंद्रनाथांची पत्नी११

मी रविंद्रनाथांची पत्नी ------------------------------- ११. मला ते लोक कलकत्त्याच्या जोडासांको वाडीला घेऊन आलेत.या वाडीच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात,मुलांना जन्म देऊन त्यांचन पालनपोषण करण्यातच मी मृत्यूच्या दरवाजा पर्यंत आलीय.डोळ्यांनी मी आता नीट पाहू शकत नाही. हात कापतायत. श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय.तरी सुद्ध एकदोन गोष्टी लिहायच्या राहिल्यात. या नि:संग धरतीवर मला दोन जीवाभावाची माणसं मिळाली होती- मझ्या दोन मुली, माधुरीलता,म्हणजे बेला आणि रेणुका. गेल्या वर्षी १५ जूनला रवि ठाकुरांनी खूप विचारपूर्वक माधुरीलताला माझ्यापासून तोडलं. तिचा विवाह करुन टाकला. कुणा बरोबर?-तर बिहारीलाल चक्रवर्तींच्या मुला बरोबर. नोतुन बोऊठानचे भक्त होते ना बिहारीलाल.बेलाचं वय  होतं पंधरा. मी रेणूकाला उरीपोटी सांभाळत जगत होते पण बेलाच्या लग्नानंतर नऊ महिन्यातच तिला देखील माझ्यापासून तोडलं. तिचं लग्न केलं अवघ्या दहाव्या वर्षी. कारण बाबा मोशायनी ८ डिसेंबर १८९९ मधे आपले अखेरचे मृत्यपत्र लिहीले होते.त्या मृत्यू-पत्रा प्रमाणे बाबा मोशाय जिवंत आहेत तोवरच मुलींच्या लग्नाचा खर्च जोडासांकोच्या खजिन्यातून होणार होत...

मी रविंद्रनाथांची पत्नी ३

मी रविंद्रनाथांची पत्नी  ------------------------------ ३. माझ्या दीरांमध्ये सर्वात मृदुभाषी, प्नतिभावंत म्हणजे ज्योतिंद्रनाथ.हे नाटकककार,संगीतकार,गायक,चित्रकार होते.दिसायला अत्यंत देखणे.रवि ठाकुरांपेक्षा काकणभर जास्तच देखणे.तरी पण पाहता क्षणीच लक्षात यायचं माणूस अत्यंत दु:खी आहे.पहावं तेंव्हा उदास दिसत.कुणात कधीच मिसळायचे नाहीत.पण एकेकाळी खूपच माणसांचे लोभी होते म्हणे.गीत,संगीत,नाटक, हे त्यांचं व्सनच होतं.पत्नीच्या,कादंबरीदेवींच्या आत्महत्ये नंतर एकदम बदलले.मी नेहमी या बदललेल्या ज्योतिंद्रनाथानाच पहात आले.त्यांच्या मनमोकळ्या,जिंदादिल व्यक्तीमत्वा बद्दल बरंच ऐकलंय मी पण ते त्यांचं रुप कधी पाह्यला नाही मिळालं मला.माझ्याशी तर कधी बोलले सुद्धा नाहीत.कदाचित मला पांढऱ्या पायाची,अपशकुनी समजत असतील.स्वाभाविकच म्हणायला पाहिजे कारण मी कारण लग्न होऊन या घरात आले त्या दिवशीच माझ्या मोठ्या नणदेचे पती शारदाप्रसाद बंदोपाध्यायांचे शिलाईदहमध्ये निधन झाले.बाबा मोशाय विवाहात अनुपस्थित होते आणि माझ्या लग्नानंतर काही महिन्यातच नोतुन बोऊठाननी आत्महत्या केली.एक गोष्ट मनात सतत टोचत राहिलीय.लहान-मोठ्यांच्...

मी रविंद्रनाथांची पत्नी २

मी रविंद्रनाथांची पत्नी  ------------------------------  २. त्यांचं म्हणणं त्यांच्या विवाहाची कुठली गोष्ट नाही.कशी‌ असेल? - माझ्यासारख्या सामान्य,अल्प शिक्षित,गावंढळ मुली बरोबरचा विवाह म्हणजे अभिमानाने सांगायची गोष्ट होऊच शकत नाही.पण माझ्या लग्नाची गोष्ट मात्र मजेदार आहे.रवि ठाकुर बरोबर लग्न- काही साधी गोष्ट आहे काय?- माझं संपूर्ण जीवन म्हणजेच माझ्या लग्नाची गोष्ट आहे.माझं लग्न झालं वयाच्या दहाव्या वर्षी.रवि ठाकुरांची बायको म्हणून जगले जेमतेम १९ वर्ष.एका पाठोपाठ एक करत त्यांच्या मुलांची आई होणं,मुलांना वाढवणं, आणि हळूहळू रुग्ण होऊन अंथरुणाला खिळण्याशिवाय दुसरे घडलेच काय माझ्या जीवनात? - नाही,नाही असेही नाही.आणखी एक आहे की गोष्ट.तीच महत्वाची. ती आहे माझी गौरवगाथा.माझा महिमा.हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागलंय की त्यांचं तेजस्वी आयुष्य हेच माझेही तेज आहे.त्यांच्या महान यात्रेतून निर्माण होणाऱ्या ईतिहासात माझे स्थान अक्षुण्ण आहे.माझ्या इतकं जवळून त्यांना कुणीच पाहिलेलं नाही.हेच माझे सौभाग्य आहे.माझ्यावरच्या ईश्वरी करुणेला अंतच नाही.सर्व बाजूनी किती सामान्य आणि तुच्छ आहे मी..! तरी पण ...

मी रविंद्रनाथांची पत्नी ६

मी रविंद्रनाथांची पत्नी ६. त्या दिवशी ते सकाळपासूनच गंभीर दिसत होते.कधी कधी असेच सकाळपासून स्वत:तच बुडालेले दिसतात.मी खोलीत कपाट आवरत होते.ते पलंगाच्या पाठीला टेकून एक इंग्रजी पुस्तक वाचत होते.अचानक विचारलं- "छोटी बहू,तू माझी " राहूर प्रेम " कविता वाचलीयस कां? " " नाही बुवा..! तुम्हाला ठाऊकच आहे तुमच्या खूपशा कविता मला समजतच नाहीत." ते बराच वेळ गप्प बसून राहिले.मला वाटलं,आता पुढे  कदाचित ते काही बोलणारच नाहीत. खरं सांगायचं म्हणजे ते साहित्यावर काही बोलू लागले की माझी पंचाईतच होते.कसं आणि काय बोलावं समजतच नाही.पण थोडावेळाने ते म्हणाले- " राहूर प्रेम " कविता खूप वर्षांपूर्वी लिहीली होती. माझ्या ' छवि ओ गान ' या संग्रहात ती आहे. " तुमच्या या " राहूर प्रेम " मध्ये असं काय आहे? " " त्यात मी माझ्याविषयी काहीच लिहीलेलं नाही.लिहीलंय ते फक्त नोतुन बोऊठान च्या मनातलं " " नोतुन बोऊठानच्या मनातलं?- असं काय होतं त्यांच्या मनात? "  " नोतुन बोऊठानच बोलतीय त्या कवितेत. छोटी बहू,मला माहिताय माझ्याविषयी तुझ्या म...