आणखी काही कविता

रास
-----
झुकलेली नजर फुले
ओठावर हसली 
ही कुठल्या देशातिल
स्वप्नकळी फुलली?..
वेडातच आकाशी
घार फिरे स्वैर..
हाय!किनारा न सुखा
दु:खाशी वैर..
ही खुडेल नक्षत्रे
बांधुनिया वारा
शब्दातुन बरसतात
हीच्या प्राणधारा..
मी भिजून चिंब उभा
गाव असा ओस..
प्रीतीचा नित्य इथे
रंगे ऋतु-रास..!!
©रमेश यशवंत वाकनीस© 

Comments

Popular posts from this blog

ओळख

मी रविंद्रनाथांची पत्नी ५

मी रविंद्रनाथांची पत्नी ७