Posts

Showing posts from April, 2024
सुस्वागतम..! सुस्वागतम..!  नमस्कार..मी स्मिता कुलकर्णी रुद्रंग प्रस्तुत 'साठवणीतल्या आठवणी' या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचं मन:पूर्वक स्वागत करते... 'जाता जाता गेला फाल्गुन सरून,चैत्रातले ऊन उतरले..पाण्यापास रंग नुरले वेगळे..फक्त ते हासले तान्ह्या परी..वाटे वाटे जीवा दृष्टीचा पाडवा,आज करू यावा आसमंती.. नुक्ताच आपण सर्वांनी चैत्री पाडवा उत्साहानं साजरा केला..त्याचा आनंद ओसरत नाही तोवरच राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या उत्सवात आपण सर्व न्हाऊन निघालो..तेंव्हा नव संवत्सराच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!  आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे,पीसीबी न्यूज चॅनलचे संपादक अविनाशजी चिलेकर आणि ज्यांच्या साठवणीतल्या आठवणी आपण ऐकणार आहोत ते मधु जोशी इथे उपस्थित झाले आहेत.कार्यक्रमाची सुरुवात नटराज पूजनानं करणार आहोत तिनही मान्यवरांना मी विनंती करते..रुद्रंगच्या रमेश वाकनीस आणि आडावदकर सरांनीही यायचं आहे.. रंगदेवतेचे आशीर्वाद घेतले  अतिथी देवो भव..! मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत.गिरीशजींचा सन्मान रुद्रंगचे अध्यक्ष रमेश वाकनीस यांनी करावा..गिरीशजींनी अ...

साठवणीतल्या आठवणी

लिहायलाच पाहिजे म्हणून

लिहायलाच पाहिजे म्हणून.. -----------------------------  आज जागतिक पुस्तक दिन.आजच्या मुहूर्तावर शेकडो नाही हजारो पुस्तक प्रकाशित होतील.पुस्तकांमध्ये खपाऊ आणि बिनखपाऊ असे दोन प्रकार असतात.ही सगळी पुस्तके थोड्याच कालावधीत महाराष्ट्रातील शासकिय, निमशासकीय,खाजगी,सार्वजनिक संस्थांच्या ग्रंथालयांमधून आपापल्या शोकेसमध्ये आपापल्या जागेवर आतुरतेने वाचकांची वाट पहात बसतील.वाचकांच्याही अनेक परी असतात.काही वाचक असे असतात की त्यांना कुठलेही पुस्तक चालते.त्यामुळे अशा वाचकांना ग्रंथालयातल्या टेबलवर पडलेलं कुठलंही पुस्तक चालते.काही वाचक फक्त धार्मिक पुस्तकच वाचतात.धार्मिक पुस्तकांचा खपही प्रचंड असतो. यातही पहिला नंबर स्वप्न व त्याचे शुभाशुभ संकेत,ज्योतिष,हस्तरेषा,वगैरेंचा लागतो.त्यामुळे अशी पुस्तके प्रकाशित करण्याकडे प्रकाशकांचा कल अधिक असतो.काही वाचकांना रहस्यकथा,गूढकथा,भयकथा यात जास्त रस असतो.यातही नारायण धारपच पाहिजे असा हट्ट नाही.लेखक कुणीही चालतो त्यांना.नवोदित असो नाहीतर दिग्गज त्यांना काही फरक पडत नाही.काही वाचक मात्र चोखंदळ असतात त्यांचे मराठी साहित्यातील ग्रंथ विषयक घडामोडींकडे विशेष लक्ष ...

लिहायलाच पाहिजे म्हणून

लिहायलाच पाहिजे म्हणून.. -------------------------- 'अगम्य' या कविते विषयी जरा सविस्तर लिहा अशी पाटीलसरांची प्रेमळ आज्ञा झाली म्हणून लिहायला बसलोय.सरांची कविता या निमित्ताने पुन्हा वाचली.पहिल्या वाचनात मला जे वाटलं,जो प्रश्न मनात उभा राहिला तोच पुन्हा मी स्वत:लाच विचारला,' या कवितेत कवी जे म्हणतोय त्यात अगम्य असं काहीच नाही,मग शीर्षक 'अगम्य' देण्याचं कारण काय?-कवीला  माणसाचं सामाजिक वर्तन कोड्यात पाडणारं वाटतंय आणि म्हणून त्यानं तसं शीर्षक दिलं असं म्हणता येईल.असो.कवितेकडे वळू..  'नयनरम्य,अद्भूत जगात कां होतात भावनिक आंदोलन.. सगळंच अगम्य. स्वत: प्रश्न उभा करायचा आणि स्वत: च त्याचं उत्तर द्यायचं असा या कवितेचा प्रवास आहे.जग कितीही नयनरम्य आणि अद्भूत भुरळ पाडणारं असलं तरी त्यात भावनिक आंदोलनं होतात, माणूस त्यात सद्सद्विवेक बुद्धी हरवून बसतो म्हणून समस्या निर्माण होतात.असं कवी स्वत:च उत्तर देतोय.. 'मालक असूनही निर्वासित होण्याचं कुणाला काहीच कसं वाटत नाही.. खरं असूनही पटत नाही.सगळच अगम्य..'  माणूस स्वत:च स्वत:चा मालक आहे.पण विवेक बुद्धीची कांस त्यानं सोडलीय...