कविता
दृष्टी ----- आरशातली प्रतिमा माझी तुझ्यासारखी दिसते जी दिसते ती व्यक्ती मजला तुझ्यासारखी दिसते.. घर कौलारु छोटेसे पण गोकुळ नांदे त्यात ती राधा ती रीत प्रीतीची तुझ्यासारखी दिसते.. जिंकायाचा चंग बांधुनी मुठी आवळूनी सज्ज प्रत्येकाची नजर विखारी तुझ्यासारखी दिसते.. तू माता,तू सखी,द्रौपदी तू कांता संतांची अस्तित्वाची ब्रह्मगाठ ही तुझ्यासारखी दिसते.. नकोनको हे कवित्व झाले तरीही ओठी येते उपाधीतली सर्व व्यर्थता तुझ्यासारखी दिसते.. ©रमेश यशवंत वाकनीस २७ सप्टेंबर २०२५ भटकबोल्या:९०९६८००६५३