Posts

Showing posts from October, 2022

फोडून टाकलेली मूस

एकांकिका : फोडून टाकलेली मूस ----------------------------------------- लेखक : रमेश यशवंत वाकनीस -------------------------------------- ( रंगमंचावर अंधुक प्रकाश.संवाद ऐकू येतात-' जराही पर्स धरा..थॅंक्यू..' मग कुलूप उघडल्याचा आवाज.दार उघडून ती आत येते.उजव्या हाताने भिंतीवरचे बटण दाबते.एका जुन्या चाळीतली खोली उजळते.तिच्या बरोबर आलेला तो बाहेरच उभा.हातातली पर्स धरुन अवघडल्यासारखा) ती : द्या ती पर्स.. हं..( पर्स घेऊन टेबलवर ठेवते. तो पायातले बूट काढताना बघून- ) घरात येऊन काढा बूट- ती खुर्ची घ्या ओढून- तो : ( खुर्चीत बसून बूट काढता काढता ) खरं तर आपण लाॅजवर पण जाऊ शकलो असतो आपण उतरलो त्या स्टाॅप समोरच होतं लाॅज.. ती : एक तर ते माझ्या घरा जवळच दुसरी गोष्ट म्हणजे हल्ली लाॅजच्या रुममधे पण छुपे कॅमेरे लावलेले असू शकतात.. तो : पाॅइंट आहे हं..एक करता भलतंच काहीतरी होऊन बसायची भिती.. ती : हो ना.बस वेळेत मिळाली म्हणून लवकर पोहोचलो.नाहीतर रोज अकरा वाजतात रात्रीचे.. तो : खरंच की,दहा वाजतायत फक्त..( ती दाराला कडी घालते. तो खोली नीट न्याहळत गुणगुणतो. ' हम तुम एक कमरेमे‌ बंद हो और ...