आणखी काही कविता
सजवून घर ठेवा
-------------
ह्रदय भरुन येते नाव येताच
ओठी..
सजल नयन त्यांच्या मंद जळतात
ज्योती..
तनुभर सजणाचा स्पर्श स्वप्नात
होतो..
अधीर मदिर रात्री चंद्र श्वासात
फुलतो..
मधुर मधुर सयींना आज भरते
कशाने..
हळुहळु विरहाचा काळ जाई
सुखाने..
बहरत तरुणाई जीवनाची निघाली
सजवून घर ठेवा प्रीत रंगात आली.
©रमेश यशवंत वाकनीस©
३/२/ १९९९
Comments
Post a Comment